पुण्यात शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडला

February 14, 2011 5:42 PM0 commentsViews:

14 फेब्रुवारी

आज पुण्याच्या मार्केट यार्डामध्ये कांद्याचे भाव पडल्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. गेल्या गुरूवारी देखील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले होते. कांद्याला फक्त 10 रूपये किलो भाव मिळाल्यामुळे शेतकरी नाराज झाले आणि त्यांनी किमान 15 रूपये भाव मिळावा अशी मागणी केली. तर कांद्यावरील निर्यातबंदी लवकरात लवकर उठवावी अशी मागणीही त्यांनी केली. तर दुसरीकडे मार्केट कमिटीच्या अधिकार्‍यांनी बाजारात कांद्यांची प्रचंड आवक झाल्याने भाव पडल्याचे सांगतांना निर्यातबंदी उठवण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे असं स्पष्ट केले. दरम्यान, जोपर्यंत निर्यात बंदी उठत नाही आणि कांद्याला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत कांदा बाजारात आणू नये असं आवाहन शेतकर्‍यांना केलं आहे.

close