‘सात खून माफ’ शुक्रवारी प्रदर्शित

February 16, 2011 11:57 AM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारी

या शुक्रवारी सात खून माफ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.सात खून माफमधून नसिरूद्दीन शहाचा दुसरा मुलगा विवान शहा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. प्रियांका चोप्राची चर्चा सगळीकडेच होत आहे ते तिच्या सात खून माफ या सिनेमा मुळे. या सिनेमाचं प्रमोशन सध्या खुप जोरात सुरु आहे.

सिनेमात प्रियांका सोबत सात वेगवेगळे हिरो आहेत. यात नसिरुद्दीन शहा यांची भूमिका आहेच पण सोबतच नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा या सिनेमाच्या निमित्ताने आपली बॉलीवुड मधली एन्ट्री करत आहे. आता बॉलीवूड मध्ये सिक्वल्सची ची धुम असताना सात खून च्या सिक्वेल बद्दल विशाल भारव्दाज म्हणतो की, या सिनेमात सुरुवातीलाच सुझैनाने आपल्या सातही नवर्‍यांना मारून टाकलं तरी पण या सिनेमाचा शेवट भावनात्मक आहे आणि तो सिनेमा तुम्हाला सगळ्यांना नक्की खिळवुन ठेवेल. या सिनेमाच्या कथे प्रमाणेचं 'डार्लिंग' हे गाणं ही चागलंच लोकप्रिय झालं आहे.

close