भुजबळांनी गैरवापर करून कारखाना खरेदी केल्याची तक्रार दाखल

February 16, 2011 1:12 PM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारी

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सत्तेचा गैरवापर करून गिरणा सहकारी साखर कारखाना खरेदी केल्याची तक्रार कारखान्याच्या सदस्यांनी मालेगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केली आहे. सहकारी तत्वावर चालणार्‍या कारखान्यांसाठी गावकर्‍यांनी 56 एकर जमीन दान केली होती. त्यासह कारखान्याची एकूण मालमत्ता 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. पण भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं ही मालमत्ता 27 कोटी रुपये या कमी भावात खरेदी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. मालेगावचे शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांनी कारखाना शेतकर्‍यांकडेच राहिल असं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात भुजबळांना कमी किमतीत कारखाना देऊन सभासदांची आणि शेतकर्‍याची फसवणूक केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

close