कर्नाटक हायकोर्टाचा येडियुरप्पा सरकारला दिलासा

February 14, 2011 5:49 PM0 commentsViews: 1

14 फेब्रुवारी

कर्नाटकच्या पाच अपक्ष आमदारांवरची निलंबनाची कारवाई कर्नाटक हायकोर्टानं कायम ठेवली. त्यामुळे कर्नाटकमधल्या भाजपच्या येडियुरप्पा सरकारला दिलासा मिळाला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी या आमदारांनी सरकारविरोधी मतदानाचा प्रयत्न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी याविरोधात दाद मागण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. पण कर्नाटक हायकोर्टानं विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवला.

close