वाळूमाफिया काळेला अटक

February 16, 2011 1:40 PM0 commentsViews: 4

16 फेब्रुवारी

पुणे जिल्ह्यातील वाळूमाफिया रामशेठ काळे यांला अखेर अटक करण्यात आली आहे. घोडेगाव पोलिसांनी राम काळेला अटक केली आहे. रामशेठ काळे याच्यावर 507 आणि 151 कलमाखाली अटक करण्यात आली आहे. या वाळू माफियाचा काल मंगळवारी आयबीएन लोकमतनं पर्दाफाश केला होता. आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर काळे फरार झाला होता अशी चर्चा होती मात्र अखेर पीएसआय ए. एन. भंडारी आणि त्यांच्या सहकार्यांनी अटक केली आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संचालक रामशेठ काळे राम काळे हा राष्ट्रवादीच्या आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमधला एक महत्वाचा कार्यकर्ता आहे. घोडेगावमध्ये वाळूमाफियांनी उच्छाद मांडला हे बघून स्थानिक पत्रकार सचिन काळे यांनी त्याविरोधात आवाज उठवला पण या वाळूमाफियाने सचिन काळेला धमकावायलाच सुरुवात केली अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्यात आलं तसंच तुला जाळून टाकू अशी धमकी दिली होती. या प्रकरणी आयबीएन लोकमतने मंगळवारी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि रामसेठ काळेसह यामागे असणार्‍या 'गॉडफादर' चे धाबे दणाणले. या घटनेच्या पर्दाफाश केल्यानंतर राम काळेला फोन लावला असता हा आवाज आपलाचं आहे अशी कबुली ही दिली होती. या प्रकरणी पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या माफियागिरीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. तसेच राष्ट्रवादीच्या लोकांनीच त्याला लपून राहायला सांगितलं असा आरोपही त्यांनी केली. तर गृहमंत्र्यांनी ही या प्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही याबाबत कोणतीही हयगय न करता कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

close