पाकिस्तानी कलाकारांना सेना आणि मनसेकडून विरोध

February 15, 2011 1:39 PM0 commentsViews: 2

15 फेब्रुवारी

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना बेहिशेबी रक्कम जवळ बाळगल्याबद्दल दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आहे. पण शिवसेना मनसेनं पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

राहते फतेह अली यांच्या आवाजानं बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली. पण आता त्यांचं नाव वादग्रस्त असलेल्या गायकांमध्ये आलं आहे.गेल्या वर्षी 8 फ्लॅट्स आणि पार्किंग स्पेस यांची मालकी असलेला अदनान सामीही वादाच अडकला होता. फॉरिन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्टप्रमाणे त्याला एवढी संपत्ती ठेवायची परवानगीच नाही.

पाकिस्तानी गायक आणि स्टँडअप कॉमेडियन रिऍलिटी शोमध्ये नेहमीच दिसत असतात. 2009 मध्ये पाकिस्तानी कॉमेडियन शकील सिद्दिकी विरोधात मनसेनं आवाज उठवला होता. अगदी अलिकडे बिग बॉसमध्ये वीणा मलिक आणि नवाझ अली हे पाकिस्तानी कलाकार होतेच आणि त्यांनाही विरोध झाला होता. पण हे विरोध फक्त राजकीय पक्ष करत नाहीत. काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत आणि एक प्रसिद्ध गजलनवाझ यांनी पाकिस्तानी कलाकारांचं भारतात जे कौतुक होतं त्यावर नाराजी व्यक्त केली होती. अमन की आशा यासारखे उपक्रम भारत पाकिस्तानात सांस्कृतिक मेळ व्हावा म्हणून प्रयत्न करत आहे. पण अशा काही घटनांमुळे या प्रयत्नांना खिळ बसत आहे.

close