स्पेक्ट्रम चौकशीसाठी जेपेसी नेमण्याची शक्यता

February 14, 2011 5:56 PM0 commentsViews: 4

14 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ए. राजा यांच्या सीबीआय कोठडीत वाढ झाली आहे. तर डीबी रियाल्टीचे प्रमोटर शाहिद बलवा यांच्या सीबीआय कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे. दोघांनाही आज पटियालाच्या कोर्टात हजर करण्यात आलं. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाची चौकशी आता एका महत्वाच्या टप्प्यावर असल्याने या दोघांच्याही कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयने कोर्टात केली होती. दरम्यान, टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी केंद्र सरकार जेपीसी नेमण्याची शक्यता आहे. बजेट सेशनच्या आधी सरकार ही घोषणा करेल असे संकेत मिळत आहे. घोटाळ्याच्या जेपीसी चौकशीसाठी विरोधी पक्ष आग्रही आहेत.

close