मुख्यमंत्री लढवणार विधान परिषदेची निवडणूक

February 15, 2011 2:07 PM0 commentsViews: 2

15 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण विधानपरिषदेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेतून निवडून जाणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतून निवडून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण आज स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वताच आपण विधान परिषद लढणार असल्याच स्पष्ट केलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीची भेट घेतली त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

close