फी नियंत्रण कायदा लवकरच !

February 15, 2011 2:58 PM0 commentsViews: 5

15 फेब्रुवारी

खाजगी शाळांच्या मनमानी फीवाढीला चाप लावण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी कायदा करण्याची केलेली घोषणा अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. खाजगी शाळांच्या फीवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचे मसुदा शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क वसूल करण्यासंबधी विनिमयन अधिनियम असं या मसुद्याचं नाव असून 22 फेब्रुवारीपर्यंत जनतेने, पालकांनी, शैक्षणिक संस्थांनी, विद्यार्थी संघटनांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आणि हरकती कळवाव्यात असं आवाहन शिक्षण विभागाने केलं आहे.

close