मनसेनं जमावली रेल्वे भरतीसाठी दीड लाख अर्ज !

February 15, 2011 8:55 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारी

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या नोकरभरतीत राज्यातल्या तरुणांची भरती व्हावी यासाठी मनसेनं 1 लाख 38 हजार 117 अर्ज जमा केले. हे फॉर्म संबंधित विभागाकडे पोहचवण्यात आले आहेत. एकूण 10 हजार 68 जागांसाठी ही भरती सुरु आहे. यापूर्वी रेल्वेभरतीमध्ये राज्यातील तरुण सहभाग घेत नसतं. त्यामुळे मनसेने ही विशेष मोहिम राबवली. राज्यभरातल्या तरुणांना या नोकरभरतीचे अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच त्यांना मार्गदर्शन ही करण्यात आले आहे. हे सर्व फॉर्म आज एका ट्रकमध्ये भरुन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे कार्यालयात जमा करण्यात आले. या मोहिमेमुळे रेल्वे भरतीतला राज्यातला 80 टक्के कोटा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

close