कॉपींचा ढिग आढळला तर शिक्षकांवर ही गुन्हे दाखल होणार

February 16, 2011 3:14 PM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारी

दहावी बारावीच्या परिक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी यावेळी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेतच, पण त्याचबरोबर एखाद्या केंद्रावर कॉंपींचा ढीग आढळल्यास शिक्षकांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या निर्णयानं शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी शिक्षक संघटनांकडून या निर्णयाला विरोध होत आहे.

close