जळगाव महापालिकेच्या महिला नगरसेविकांकडून बांगड्याचा आहेर !

February 15, 2011 1:16 PM0 commentsViews: 6

15 फेब्रुवारी

सोमवारी जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या विशेष सभेत वाढीव पाणीपट्टीच्या निषेधार्थ जोरदार गोंधळ झाला होता. याप्रकरणी आज विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिकेत तोडफोड करणा-या भाजपच्या नगरसेवकांना निलंबित करण्याचा ठराव या सभेत मंजूर झाला. विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या चिथावणीनं हा हल्ला झाल्याचा आरोप स्थायी समिती सभापती रमेश जैन यांनी या सभेत केला.या सभेला भाजपचे नगरसेवक मात्र अनुपस्थित होते. सभागृहातील महिला नगरसेविकांकडून आयुक्त प्रकाश बोखड यांना बांगड्यांचा आहेर देऊन या बांगड्या भाजप नगरसेवकांना पाठवण्याची मागणी केली. भाजप नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणीही या सभेत मंजूर झाली. सत्ताधारी खान्देश विकास आघाडी, शहर विकास आघाडी यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ही मागणी केली होती. नगरसेवक निलंबनाला विरोध करणारे एकमेव नगरसेवक नरेंन्द्र पाटील आणि इतर नगरसेवक यांत जोरदार खडाजंगी झाली.

close