मंत्रालयापर्यंत हातमिळवणी क रून अवैध वाळूचा उपसा सुरू !

February 16, 2011 3:21 PM0 commentsViews: 5

16 फेब्रुवारी

महसूल विभाागातील अधिकारी आणि मंत्रालयापर्यंत हातमिळवणी क रून मराठवाड्यात सध्या ठेकेदार वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. गोदापात्रात तर समुद्रातून वाळू उपसणारी यंत्रसामग्री वापरून वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं वाळू पट्याचे लिलाव केल्यानंतर वाळू उपशाला सुरूवात झाली. पण ठरवून दिलेल्या पट्‌ट्यामध्ये नियमबाह्य पध्दतीने वाळूचा उपसा करून ठेकदारांनी मनमानी चालवली आहे.

वाळू उपसण्यासाठी काही अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यास बंदी असतानाही राजरोसपणे उपसा सुरू आहे. कुरणपिंपरी, वडवाळी या अधिकृत पट्‌ट्यांमध्ये वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. तर काही भागात वाळूपट्‌ट्याचे लिलाव झालेले नसतानाही वाळूचा उपसा होत आहे. पैठण तालुक्यातील सात वाळूपट्टयांचे नऊ कोटी रूपयांत लिलाव झाले आहे पण हिरडपुरी इथं लिलाव झालेला नसतांना अनधिकृतपणे वाळूचा उपसा होत आहे. याकडंे अधिकारी दुर्लक्ष करतायेत आणि त्यांचं दुर्लक्ष करण्याचं कारण म्हणजे वाळूचे ठेकदार थेट मंत्रालयातून मुदतवाढ घेऊन येत असल्याचं समजतं आहे.

close