राज्यात 28 खाजगी आश्रमशाळांची मान्यता रद्द

February 15, 2011 9:26 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारी

राज्यभरातल्या 28 खाजगी आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तांनी हा निर्णय घेतला. या आश्रमशाळेत निकृष्ट जेवण, राहण्याची बकाल व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची सुविधांचा अभाव असल्याने ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यातल्या काही आश्रमशाळा माजी मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या नातेवाईकांंच्या आहेत. नाशिक विभागातले – 8, अमरावती विभागातले – 10, तर नागपूर विभागातील -10 आश्रमशाळांचा यात समावेश आहे.

close