विमानतळावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये !

February 15, 2011 3:29 PM0 commentsViews: 9

15 फेब्रुवारी

विमानतळावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपने दिला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. त्याविरोधात भारतीय जनता पार्टीने आज इशारा आंदोलन सुरु केलं आहे. विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच सध्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण इथं विकासाचा एक मोठा प्रकल्प सुरु केल्याने तो पुतळा दुसरीकडे हलवण्याचा निर्णय जुलै 2010 मध्ये घेण्यात आला आहे. त्यानुसार विमानतळाच्या बाहेर वेअरहाऊसच्या बाजुला हा पुतळा हलवण्यात येणार आहे. त्याठिकाणी चबुतर्‍याचे कामही पूर्ण होत आलं आहे. पण हा चबुतरा ड्रेनेजच्या पाईपलाईनवर असल्याने तो बेकायदेशीर आहे असं म्हणत भारतीय जनता पार्टीने याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

close