सिद्धिविनायकाला क्रिकेटप्रेमींचं साकडं

February 17, 2011 1:08 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी

भारतीय क्रिकेट टीमला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे आणि यात राजकारणीही मागे नाहीत. सध्या माघी गणेशोत्सव सुरु आहे. आणि त्याचं औचित्य साधून मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीगणेशालाच साकडं घातलं. भारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकावा अशी प्रार्थना या लोकांनी केली. आणि वर्ल्ड कप ट्रॉफीच्या प्रतिकृतीची पूजाही यावेळी करण्यात आली.

close