पुण्यात पंडित भीमसेन जोशींच्या स्मृती कार्यक्रमाचं आयोजन

February 16, 2011 3:28 PM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारी

भारतरत्न पंडित भीमसेन जोशींना पुण्यात आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात येणार आहे. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग प्रशालेच्या मैदानावर एक संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित होणार्‍या या 3 दिवस कायक्रमाचे उद्घाटन गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या मनोगतानं होणार आहे. तर कार्यक्रमाची सांगता पंडितजींनीच गायलेल्या एका भैरवीच्या व्हिडिओ क्लिपिंगनं होणार आहे.

close