राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर खासदारांची बैठक संपन्न

February 17, 2011 1:32 PM0 commentsViews: 6

17 फेब्रुवारी

आज मुंबईत महाराष्ट्रातल्या खासदारांची बैठक झाली. महाराष्ट्रातल्या 40 खासदारांची लक्षणीय उपस्थिती हे या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तसेच साखर निर्यात बंदीवरचा निर्णय लवकरच होईल असंही सांगण्यात आलं आहे. या बैठकीत केंद्रात प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ऍक्शन टेकन रिपोर्ट काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वे, कांदा, साखर, मिठी नदी, पुणे इथं नवे विमानतळ, मुंबई लोकल ट्रेन, जेएनआरयुएम, ब्रिम्स्टोवॅड, सीआरझेड या प्रश्नांवर चर्चा झाली. 40 खासदारांकडून एकूण 400 सूचना आल्या आहेत. त्यामुळे गरज पडली तर याबाबत पंतप्रधान किंवा अर्थमंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा विचार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

close