दुधदरवाढीचा निषेधार्थ पुण्यात आंदोलन

February 16, 2011 3:35 PM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारी

राज्यभरात झालेल्या दुधदरवाढीचा निषेध करण्यासाठी आज पुण्यामध्ये शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातल्या मंडईतल्या टिळक पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टोपलीत खोट्या नोटा ठेवत त्यामध्ये दुधाच्या पिशव्या ठेवल्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या प्रतिकृतीला नोटांचा हार घातला. आणि आंदोलन केलं. दुध दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली. दरवाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

close