बुलढाण्यात कापसाच्या गोदामाला आग

February 16, 2011 3:39 PM0 commentsViews: 3

16 फेब्रुवारी

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका कापसाच्या गोदामाला आग लागली. यात कापसाच्या 2200 गासड्या जळून खाक झाल्या. या आगीत जवळपास 7 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट झालं नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. परंतू अजूनही आग अटोक्यात आली नाही.

close