पुण्यात पीएमपीएलच्या कर्मचार्‍यांचा लाक्षणिक संप

February 17, 2011 1:36 PM0 commentsViews: 5

17 फेब्रुवारी

पुण्यात पीएमपीएलच्या कर्मचार्‍यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. सहावा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात पीएमपीएलचे 8 ते 10 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. पण या संपामुळे पुणेकरांचे हाल झाले आहे. पुणेकरांची लाईफलाईन असलेल्या पीएपीएमएल बसेस या संपामुळे ठप्प झाल्या आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी आम्ही पुरेपुरे प्रयत्न करीत असल्याचं पीएपी प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे तर सहावा वेतन आयोग लागू झाला नाही तर 21 तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचा-यांनी दिला आहे.

close