ठाण्यात बेस्ट बसची सेवा सुरू

November 5, 2008 2:36 PM0 commentsViews: 5

5 नोव्हेंबर ठाणे, ठाण्यात बेस्ट बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. ठाणे ते बोरिवली आणि बोरिवली ते ठाणे अशी ही सेवा असणार आहे. दिवसभरात बेस्टच्या वीस बसेस ठाणे-बोरिवली सेवेसाठी धावतील. परंतु बेस्टच्या या सेवेला ठाण्यातील टीएम्‌टी कर्मचा-यांनी आणि काही रिक्षा युनियनने विरोध केलाय. काही दिवसांपूर्वी याच मुद्यावरून टीएम्‌टीच्या उपव्यवस्थापकांना मारहाण करण्यात आली होती. बेस्टच्या सेवेला राष्ट्रवादी पक्षानं पाठिंबा दिलाय. पण कामगार युनियनच्या शरद राव गटाने मात्र या सेवेला विरोध केला आहे. बेस्ट सेवेमुळे टीएमटी कर्मचारी आणि हजारो रिक्षा चालकांच्या पोटावर पाय पडेल असं कामगार नेते शरद राव यांचं म्हणणं आहे.

close