भेळ घ्या..भेळ आयएसओ प्रमाणित भेळ..!

February 15, 2011 5:15 PM0 commentsViews: 31

प्राची कुलकर्णी पुणे

15 फेब्रुवारी

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला किंवा सरकारी ऑफिसला आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याचे आपण ऐकतो. पण पुण्यामध्ये चक्क एका भेळीच्या दुकानाला हे आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. गणेश भेळ हे पुण्यातील प्रसिद्ध भेळेचं दुकान आता आयएसओ प्रमाणित झालं आहे.

मुरमुरे .. चिंचेचं पाणी.. आणि खास मसाला… तयार झाली मस्त चटपटीत भेळ. भेळेचं नुसत नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण ही भेळ साधीसुधी नाही तर आहे आयएसओ प्रमाणित भेळ आहे. सर्व निकष पूर्ण केल्यामुळे गणेश भेळला आयएसओ प्रमाणपत्र मिळालं आहे. हे प्रमाणपत्र मिळवणारे ते भेळेचं पहिलं दुकान ठरलं आहे. 1978 मध्ये सुरु झालेल्या या भेळेची पुण्यामध्ये आता तब्बल 5 दुकान सुरु झाली आहेत. इतक्या वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी भेळेची तीच चव राहिल्याने वयस्कर लोकांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकाचीच ही भेळ हॉट फेव्हरेट आहे.

मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा पाहताना पॉपकॉर्न खाणं तर नेहमीचंच आहे. पण आता गणेश भेळने खास मल्टिप्लेक्समध्ये खाता येतील असे भेळेचे पॅक्सही बनवले आहेत. घरी हवी तेव्हा बनवून खाता येईल अशी पॅक्स इतकंच नाही तर खास निर्यात करता येतील असे पाउचही गणेश भेळमध्ये मिळतात.

close