‘तुझ्या टपोर डोळयात’ मिलिंदचा नवा अल्बम

February 17, 2011 3:20 PM0 commentsViews: 3

17 फेब्रवारी

कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या सखे साजणी या कवितेवर आधारीत गारवा फेम मिलिंद इंगळेनं त्याचा एक नवा अल्बम लाँच केला आहे. तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव हा मिलिंदचा नवा अल्बम नुकताच लाँच करण्यात आला. हा अल्बम गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते लाँच करण्यात येणार होता पण त्यांच्या अनुपस्थिमुळे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांनी या अल्बमचं लाँच केलं. यावेळेस अनेक मान्यवरआवर्जून हजर होते. गारवा आणि सांज गारवा नंतर लाँच झालेला अल्बम तुझ्या टपोर डोळ्यात हे नॉनस्टॉप 36 मिनिटांचे गाणं प्रेक्षकांना नक्कीच थंडावा देईल.

close