मंत्रिमंडळात फेरबदलाचे पंतप्रधानांनी दिले संकेत

February 16, 2011 9:26 AM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारी

भ्रष्टाचाराच्या आरोपांसदर्भात आपण जेपीसीसह कोणत्याही चौकशी समितीसमोर जायला तयार आहोत. या आरोपांना घाबरून राजीनामा देणार नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलं आहे. गेल्या काही महिन्यातल्या घोटाळ्यांसदर्भात त्यांनी आज देशभरातल्या न्यूज चॅनेल्स आणि न्यूजपेपर्सचे संपादक यांच्याशी संवाद साधला.संपादकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरंही दिली. घोटाळे उघड करण्यात मीडियाने महत्वाची भूमिका बजावली याबद्दल पंतप्रधानांनी मीडियाचं कौतुक केलं. मात्र केवळ नकारार्थी गोष्टींवरच लक्ष केंद्रीत करू नका असं आवाहनही त्यांनी केलं. देशाचा आत्मविश्वास कमी होईल असं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत असंही ते म्हणाले.

बजेट अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात बरेच फेरबदल होण्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच भ्रष्टाचार्‍यांना कडक कारवाई होईल असं आश्वासनंही त्यांनी दिलं आहे. 2 जी स्पेक्ट्रमप्रकरणी लायसन्स केवळ ए.राजा यांनी दिले होते त्याच्याशी पंतप्रधान कार्यालयाचा काहीही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला आणखी बरीच कामं करायची आहेत. त्यामुळे आता राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असंही पंतप्रधान म्हणाले. मात्र पुढचा पंतप्रधान कोण असेल हे मी आता सांगणं कठीण असल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधानांनी दहशतवाद, काँग्रेसमधला अंतर्गत असंतोष, महागाई अशा मुद्यांवरही मतं मांडली.

close