क्रिकेट प्रेमापोटी कर्ज काढून त्यांनी गाणं तयार केलं

February 17, 2011 4:03 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीमनेच बाजी मारावी असं देशातल्या तमाम क्रिकेट फॅन्सना वाटत आहे. काही लोक तर त्यासाठी देवाला नवस बोलत आहे. तर मुंबई जवळ उल्हासनगरमध्ये राहणारे युसुफ शेख सचिन तेंडुलकरचे निस्सिम चाहते आहेत. आणि सचिनच्या हातात वर्ल्ड कप दिसावा अशीच त्यांची इच्छा आहे. सचिनला आणि वर्ल्ड कप टीमला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी एक गाणं बनवलं आहे. युसुफ पेशाने टेलर आहेत. आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. पण क्रिकेट प्रेमापोटी कर्ज काढून हे गाणं त्यांनी तयार केलं आहे. राजा हसन यांनी हे गाणं गायलं आहे.

close