दुसर्‍या सरावात भारतचा दणदणीत विजय

February 16, 2011 4:29 PM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारी

भारतीय टीमनं मिशन वर्ल्ड कपला धडाक्यात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडचा 117 रन्सनं पराभव करत भारताने सलग दुसरा सराव सामना ही जिंकला आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगलेल्या या मॅचमध्ये भारताने पहिली बॅटिंग करत 360 रन्सचा डोंगर उभा केला.याला उत्तर देताना न्यूझीलंडची इनिंग अवघ्या 243 रन्सवर आटोपली. भारतीय स्पिन बॉलर्सनं पुन्हा एकदा कमाल केली.मॅक्युलमचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. मॅक्युलमनं 58 रन्स केले. भारतातर्फे हरभजन सिंग, युवराज सिंग, पियुष चावला आणि आशिष नेहरान प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत.

close