मेहता बंधूंनी दडवले हजारो कोटी रुपये !

February 17, 2011 4:20 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी

मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलचे मालक मेहता बंधूंनी हजारो कोटी रुपये परदेशी बँकांत दडवले आहे अशी माहिती आयबीएन लोकमतला सूत्रांनी दिली आहे. कर बुडवण्यासाठी मेहतांनी मॉरिशियस, लीचेस्टाईन, बहामास, जिनीवा आणि दुबईत हा काळा पैसा दडवला आहे. गेल्या 9 वर्षांपासून ते या देशांत पैसा दडवत असल्याचा धकादायक बाब समोर आली आहे. तर प्रबोध कीर्तिलाल मेहता, रश्मी कीर्तिलाल मेहता आणि त्यांची मुलं हे मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलचे विश्वस्त आहेत.विशेष म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक बड्या राजकारण्यांशी मेहतांचे घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंतभारतात कुठलीही कारवाई नाही.

close