स्पेक्ट्रम करूणानिधींच्या मुलीची चौकशी होण्याची शक्यता

February 17, 2011 5:03 PM0 commentsViews: 4

17 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामधे आता आणखी काही बड्या नेत्यांची चौकशी लवकरच होणार आहे. आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करूणानिधींची मुलगी आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांची लवकरच चौकशी होणार आहे. तसेच करुणानिधींच्या मालकीच्या कलैंयर या टीव्ही चॅनलमधल्या वरिष्ठ अधिका-यांची चौकशी सीबीआय लवकरच करणार आहे. काल अनिल अंबानींची चौकशी केल्यानंतर आज गुरूवारी एसार समूहाचे सीईओ प्रशांत रुइया यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. स्पेक्ट्रम घोटाळ्यात ज्या कंपन्यांना फायदा झाला त्या सर्व कंपन्यांच्या अधिका-यांना सीबीआय बोलवणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

close