आदर्श प्रकरणी 25 सभासदांना समन्स

February 16, 2011 4:26 PM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारी

आदर्श प्रकरणी न्यायालयीन आयोगाकडून समन्स बजावण्यास सुरवात झाली. न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांच्या आयोगानं सोसायटीच्या 25 सभासदांना समन्स बजावलं आहे. येत्या दोन दिवसात उर्वरित 78 सदस्यांना समन्स बजावलं जाणार आहेत. नोटीस मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत या सदस्यांना आयोगाला आपलं उत्तर द्यावं लागणार आहे. यात या सदस्यांनी फ्लॅट कशा पद्धतीनं घेतला यासह एकूण 13 मुद्यांवर प्रश्न विचारले जाणार आहेत.

close