पिंपरी-चिंचवडमधील कत्तलखान्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

February 17, 2011 5:14 PM0 commentsViews: 15

17 फेब्रुवारी

पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागी असलेल्या कत्तलखान्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेला हा कत्तलखाना मागील 22 वर्षापासून सुरु आहे. या कत्तलखान्यातील कचरा आणि मासाचे तुकडे उघड्यावर फेकले जातात. आरोग्यावर परिणाम होत असल्याने हा कत्तलखाना तत्काळ हटविला जावा यासाठी स्थानिक सात दिवसांपासून उपोषणला बसले आहे. तर आपण महापालिकेकडे वेळो-वेळा विनंती करुनही महापालिका पर्यायी जागा देत नसल्याने कत्तलखाना बंद करता येत नसल्याचं कत्तलखान्याच्या मालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कत्तलखान्यामुळे होणार्‍या त्रासाला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. तर लवकरच याप्रकरणी तोडगा काढून कत्तलखान्याला पर्यायी जागा देण्याचे आश्वासन महापौरांनी दिलं आहे.

close