आऊटसोर्सिंग कमी होणार नाही – पी. चिंदबरम

November 5, 2008 3:51 PM0 commentsViews: 6

5 नोव्हेंबर, दिल्लीकेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारत आणि अमेरिकेमधील आऊटसोर्सिंग कमी होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. बराक ओबामा हे उभय देशातील संबंधांमध्ये महत्त्वाचा अनुकूल दुवा ठरतील, असं त्यांना वाटतंय. ' उभय देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आऊटसोर्सिंगवर दोन्ही देशांतून काय मतं व्यक्त केली गेलीत, याला महत्त्व देता कामा नये. जेव्हा ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतील तेव्हा त्यांना दोन्ही देशातल्या संबंधांची जाणीव होईल. कारण अमेरिका ही जगातली एक मोठी अर्थव्यवस्था आहे आणि भारत हा खुलं व्यापारी धोरण असणारा देश आहे', असं अर्थमंत्री यावेळी म्हणाले.

close