वाळू उपशाच्या धोरणात सरकार बदल करणार !

February 18, 2011 10:12 AM0 commentsViews: 6

18 फेब्रुवारी

वाळू उपश्याबाबत सरकार नवीन धोरण तयार करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. तसच खाणींच्या दगडांपासून वाळू तयार करण्याला परवानगी देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. अण्णांच्या मागण्यांवर 1 महिन्यात कारवाई करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. दरम्यान अण्णा हजारे उपोषणाच्या मुद्यावर ठाम आहेत हे उपोषण लोकपाल बिलाला मंजुरी मिळावी यासाठी आहे असंही अण्णांनी सांगितलं आहे. तसेच बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही भ्रष्टाचार प्रकरणांसाठी स्वतंत्र न्यायालय असावं अशी मागणीही अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

close