तरुणच जगामध्ये बदल घडवून आणू शकतात – लामा

February 18, 2011 3:54 PM0 commentsViews: 4

18 फेब्रुवारी

मुंबई विद्यापीठाच्या कन्व्होकेशन हॉलमध्ये एक विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. प्राचीन तत्व विचार आणि आधुनिक विचार या विषयांवर दलाईलामांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान दलाई लामा यांनी तरुणच जगामध्ये बदल घडवून आणू शकतात आणि त्यासाठी तरुणांनी विचार प्रगल्भ होण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले आहे. भारत हा आपल्या गुरुचा देश आहे. त्यामुळे इथल्या तरुणंाना भेटल्यानंतर एक वेगळा अनुभव आपल्याला आल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर यांच्यासह अनेक मान्यवर सावेळी उपस्थित होते.

close