मुख्यमंत्र्यांनी केला ‘वर्षा’ मध्ये गृहप्रवेश

February 18, 2011 10:16 AM0 commentsViews: 4

18 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारला आज 100 दिवस पूर्ण झाले. माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांनी तब्बल 100 दिवसांनंतर आपल्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षामध्ये प्रवेश केला. वर्षा बंगल्यावरचा मुख्यमंत्र्यांचा हा गृहप्रवेश विधीवत झाला. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्याचा चेहरामोहरा बदलवला आहे. फारसं इंटिरिअर न करता खास दिल्ली स्टाईलचं घर त्यांनी सजवले आहे. पण वर्षा बंगल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत मात्र आमूलाग्र बदल करण्यात आला आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासी कार्यालय असलेल्या तोरणा बंगल्याचीसुद्धा नव्याने सजावट करण्यात आली. शिवाय वर्षा बंगल्याच्या कपाऊंड वॉलची उंची सुरक्षेच्या कारणावरून वाढवण्यात आली आहे. दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांच्या आजपर्यंतच्या कामगिरीवर सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तषीर्ंनी समाधान व्यक्त केलं आहे.

close