कृपाशंकर सिंग यांच्यावर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप

February 18, 2011 4:02 PM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारी

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या बेहिशेबी संपत्ती संदर्भात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कृपाशंकर सिंग यांनी आपल्या पदाचा गैरउपयोग केला असल्याचा आरोप केला आहे. कृपाशंकर सिंग हे गृहराज्यमंत्री असतांना त्यांनी आपल्या शिक्षणासंदर्भातील कागदपत्रेही खोटी लावल्याच याचिकेत सांगण्यात आल आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्याशी कृपाशंकर यांचे संबध असून कोट्यवधीच्या घोटाळ्यात कृपाशंकर सिंगही सामिल असल्याचं याचिकार्त्यांनी कोर्टाला सांगितलं आहे.

close