कांद्यावरची निर्यातबंदी मागे

February 17, 2011 9:49 AM0 commentsViews: 3

17 फेब्रुवारीकांद्याची निर्याबंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. कांद्याचे भाव गगणाला भिडले असता कांद्यावर निर्यात बंदीची मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती त्यानुसार कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.पण शेतकर्‍यांच्या गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केलं होतं. आज गुरूवारी अखेर ही निर्यात बंदी उठवण्यात आली आहे. मंत्रीगटाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मात्र 600 डॉलर प्रतिटनाने कांद्याची निर्यात होणार आहे असा निर्णय मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याची निर्याबंदी मागे घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारनं लावून धरली होती.साखरेवरची निर्यातबंदी उठवण्यबाबत मात्र निर्णय होऊ शकला नाही. कृषिमंत्री शरद पवार आजच्या बैठकीला हजर नव्हते त्यामुळे हा निर्णय झाला नाही असं समजतं आहे. क्रिकेट वर्ल्डकपचं आज ढाक्यात उद्घाटन आहे.त्यामुळे शरद पवार आजच्या बैठकीला येऊ शकले नाही.

close