सचिनचं जिमचं स्वप्न राहणार अपूर्ण

February 18, 2011 10:25 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारीसचिन तेंडुलकरला आपल्या नव्या घरी जिम बांधण्यास महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास खात्यान परवानगी नाकारली आहे. सचिन तेंडुलकरसाठी मुंबईतील बाद्रा परिसरातील पेरी क्रॉस रोड येथे चार मजली इमारत तयार होत आहे. इमारतीचे काम करणार्‍या आर्किटेक्टचर कंपनीने नगरविकास खात्याकडे इमारतीच्या जिम साठी वाढीव एफएसआयची मागणी केली होती. सचिन तेंडुलकरचे आपल्या नव्या घरी जिम असावे असे स्वप्न आहे. पण नगरविकास खात्याच्या या आदेशामुळे सचिनचे स्वप्न आता फक्त स्वप्नच राहणार आहे. नगरविकास खात्याने परवानगी नाकारतांना सचिनच्या इमारतीसाठी एकुण 8 हजार 998 स्वेअर फुट प्लॉटसाठी जो एफएसआय देण्यात आला आहे तो वाढवणे नियमानुसार शक्य नसल्याच सागितले आहे. सचिनच्या घरासाठी संपूर्ण इमारतीसाठी संपूर्ण एफएसआय वापरण्यात आला आहे. या इमारतीसाठी सीआरझेड कायद्यां लागू होत असल्याने एफएसआय वाढवणे शक्य नसल्याच नगरविकास खात्यातील सुत्रांनी दिली आहे.

close