‘रेट’ ठरवणारा पोलीस निरीक्षक अखेर निलंबित

February 18, 2011 4:15 PM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारी

अटक न करता प्रकरण मिटवण्यासाठी व्यापार्‍याकडून 2 लाख रुपयांची मागणी करणारे पोलिस निरीक्षक शाम सोनवणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. आयबीएन लोकमतनं या लाचखोरीचा पर्दाफाश केला होता. कफ परेडचे पोलीस निरीक्षक शाम सोनावणे यांनी याच भागातील जिंतेंद्र पटेल या व्यापार्‍याचा साडे बारा लाख रुपयांचा रेडिमेड कपड्यांचा माल पकडला होता. या प्रकरणात जितेंद्रच्या वडिलांना आणि भावाला अटक करु नये यासाठी सोनवणे यांनी जितेंद्र पटेल यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती.

close