पाकिस्तानच्या टीमला मुंबईत खेळू खेळू न देण्याचा शिवसेनेचा इशारा

February 17, 2011 9:58 AM0 commentsViews: 1

17 फेब्रुवारी

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. पण एवढी मोठी स्पर्धा भारतात होत असताना शिवसेनेने मात्र स्पर्धेच्या निमित्ताने वेगळीच राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न चालवला आहे. वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानची टीम फायनलमध्ये पोहोचणारच नाही पण जर पोहोचलीच तर त्यांची मॅच मुंबईत खेळू द्यायची की नाही ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच ठरवतील असं विधान शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी यांनी केलं. पाकिस्तानला देशात खेळू द्यायचे नाही ही शिवसेनेची भूमिका कायम आहे असं ते म्हणाले. खासदारांच्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी मीडियाशी बोलताना जोशी यांनी हा इशारा दिला. अर्थात शिवसेनेची नक्की भूमिका आणि पुढची आंदोलनाची दिशा फायनल जवळ आल्यावर आणि पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचले तर ठरवण्यात येईल असं म्हणायला ते विसरले नाहीत.

close