वाळूमाफिया काळेला जामीन ; पत्रकांराचा आंदोलनचा इशारा

February 18, 2011 10:48 AM0 commentsViews: 6

18 फेब्रुवारी

पुणे जिल्ह्यातील वाळू माफिया राम काळेला जामीन मिळाला आहे. आयबीएन लोकमतने काळेच्या गुंडगिरीचा पर्दाफाश करुनही पोलिसांनी जुजबी कारवाई केली. आंबेगाव तालुक्यातील घोड नदीतील नियमबाह्य वाळू उपसा पत्रकार सचिन काळे यांनी उघडकीस आणला. त्यामुळे ठेकेदार राम काळेंने जीवे मारण्याची धमकी दिली होती. राम काळेच्या धमकीचा फोन आयबीएन लोकमतनं सगळ्यांसमोर आणल्यानं खळबळ उडाली. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. पण काळेवर पोलिसांनी जुजबी गुन्हे दाखल केले. दरम्यान राम काळेवर अजामीनपात्र कलमे लावावी. अन्यथा शिवजयंती उत्सवात काळ्या फिती लावून मुख्यमंत्र्यांसमोर निषेध केला जाईल असा इशारा पत्रकारांनी दिला आहे.

close