‘आदर्श’च्या सर्व व्यवहारांची सीबीआयनं चौकशी करावी !

February 17, 2011 10:09 AM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी

आदर्श प्रकरणी सोसायटीच्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याच्या सूचना हायकोर्टाचे न्यायाधीश मारलापल्ली यांनी दिल्या या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेल्या प्रत्येक सदस्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी बँक खात्यांची चौकशी करावी या स्वरूपाचे आदेश देण्यात आले. सोबतच आदर्शच्या फाईलमधल्या गहाळ कागदपत्रं प्रकरणाचा तपासही सीबीआयने करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. या सोसायटीत अर्ध्याहून अधिक फ्लॅट हे बेनामी असावेत असा निष्कर्ष हायकोर्टाने काढला होता. आतापर्यत या प्रकरणाचा तपास कुणी जमीन हडपली या अनुषंगाने सुरु होता. पण आता कुणी पैसे गुंतवले या अंगाने सीबीआयला चौकशी करावी लागणार आहे.

close