सुलोचना चव्हाण यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

February 18, 2011 5:24 PM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारी

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार यंदा लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना देण्यात आला. आज मुंबईतल्या गेट ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सप्तरंग या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार सुलोचना चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रुपये, शाल आणि मानपत्र असं आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍यांना देण्यात येतो.

close