अडवाणींनी मागितली सोनिया गांधी यांची माफी

February 18, 2011 5:22 PM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारी

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची माफी मागितली. सोनिया गांधी आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचं परदेशी बँकेमध्ये खातं असल्याचा आरोप अडवाणींंनी केला होता. त्यांनतर सोनिया गांधींनी अडवाणी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशाप्रकारचे कुठलंही खात दोघांच्या नावावर कुठल्याही परदेशी बँकेमध्ये नसल्याचं त्यांनी त्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर आज गुवाहाटीमध्ये भाजपच्या एका सभेत अडवाणी यांनी सोनिया गांधींची माफी मागितली. तसेच त्यांनी यावेळी परदेशी बँकेमध्ये देशातल्या किती लोकांचे पैसे गुंतलेले आहेत त्याची यादी सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली.

close