जळगावमध्ये 125 साप मृतअवस्थेत आढळले

February 17, 2011 10:41 AM0 commentsViews: 156

17 फेब्रुवारी

जळगाव जिल्ह्यातल्या वाघोड गावाजवळ 100 ते 125 साप मृतावस्थेत आढळले आहे. हे साप मारुन नाल्यात फेकण्यात आले आहे. ही घटना रावेर तालुक्यातील वाघोड गावात घडली. या सापांचं विष आणि विषदंत काढून नंतर त्यांना मारण्यात आल्याचा अंदाज आहे. पण काही तस्करांचंही हे काम असाव का याचा शोध स्थानिक पोलिसांकडून घेतला जात आहे.

close