दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी एका व्यापा-याला सहा महिन्याची शिक्षा

November 5, 2008 3:58 PM0 commentsViews: 13

5 नोव्हेंबर मुंबई,दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी आज मुंबई कोर्टानं एका व्यापा-याला सहा महिन्याची शिक्षा दिली. आजपर्यंत सुनावण्यात आलेल्या शिक्षेपैकी ही सर्वात कडक शिक्षा आहे. जय उपाध्याय असं या तरुण उद्योगपतीचं नाव आहे. तो दुस-यांदा दारू पिऊन गाडी चालवतांना पकडला गेला. गेल्या वर्षी मुंबई शहरातच विविध रस्ते अपघातात 650 लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातांच्या वाढत्या घटनांमुळेच मुंबई पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांविरोधात कडक मोहिम सुरू केलेली दिसत आहे.

close