जेपीसीची घोषणा मंगळवारपर्यंत होण्याची शक्यता

February 18, 2011 5:29 PM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समिती नेमण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत सरकार ही घोषणा करेल अशी शक्यता आहे. सोमवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तर विरोधकांनी 2जीसह आदर्श आणि कॉमनवेल्थ स्पर्धेतल्या घोटाळ्यासंदर्भातही जेपीसीची मागणी केली आहे. पण आदर्श आणि कॉमनवेल्थ स्पर्धेच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करण्यात सरकार उत्सुक नाही अशी माहितीही सूत्रांनी दिली. याबाबतचा अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेतला जाणार आहे.

close