क्रिकेटच्या महायुध्दाला सुरूवात

February 19, 2011 8:56 AM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारी

वर्ल्ड कपची पहिली मॅच भारत आणि बांगलादेश दरम्यान सुरु झाली. बांगलादेशचा कॅप्टन शकीब अल हसनने टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग दिली. सेहवाग आणि सचिनने भारताला खणखणीत ओपनिंग करुन दिली. 9व्या ओव्हरमध्येच भारताने पन्नास रनचा टप्पा पार केला. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फोर मारत सेहवागने धडाका सुरु केला. मग सचिनही मागे राहिला नाही. इस्लाम आणि हुसेनची बॉलिंग दोघांनी फोडून काढली. पण चांगल्या सुरुवातीनंतर भारताला लगेचच पहिला धक्काही बसला. सचिन तेंडुलकर 28 रन्सवर रनआऊट झाला. आता तिसर्‍या क्रमांकावर गौतम गंभीर मैदानात आला. या पहिल्या मॅचसाठी भारत आणि बांगलादेश संघात हा सामना होत आहे. बांगलादेशच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर ही लढत होत आहे. या मॅचवर दोन्ही टीमचं क्वार्टर फायनलमध्ये जाणं अवलंबून नाही. पण गेल्या वर्ल्ड कपमधल्या धक्कादायक पराभवामुळे भारतीय टीमसाठी ही मॅच प्रतिष्ठेची नक्कीच आहे.

close