वर्ल्ड कप स्पर्धेचं शानदार उद्घाटन

February 17, 2011 11:54 AM0 commentsViews:

17 फेब्रुवारी

क्रिकेटच्या महासोहळ्याला आजपासून सुरुवात झाली.बांगलादेशमध्ये ढाक्याच्या वंगबंधू स्टेडियमवर या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा रंगला. बांग्लादेशचे राष्ट्रगीत आमार सोनार बांगलानं या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. वर्ल्डकप मध्ये सहभागी 14 देशांच्या कॅप्टन्सचं खास सायकल रिक्षातून स्वागत झालं. बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. भारत आणि बांगलादेशच्या संस्कृतीची ओळख जगाला करुन देणारा हा सोहळा होता. या दोनही देशातील पारंपरिक संगीत आणि जोडीला आधुनिक पॉप असा कार्यक्रमाचा बाज होता.आयसीसी अध्यक्ष शरद पवार, सीईओ हरुन लोगार्ट आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोस्तफा कमाल सोहळ्याला उपस्थित होते. हा वर्ल्ड कप आतापर्यंतचा सगळ्यात भव्य आणि संस्मरणीय वर्ल्ड कप होईल अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

दरम्यान आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणात चक्क बांगला भाषेत बांगलादेशच्या पंतप्रधान, बांगलादेश क्रिकेट आणि तिथल्या जनतेचे आभार मानले. या सोहळ्याचं विशेष म्हणजे महाराष्ट्राची पारंपारिक लेझीम सादर करण्यात आली.याचबरोबर पंजाबचा भांगडाही सादर करण्यात आला.

close