देशाची चिंता करणारे मीडियावाले रात्री ग्लास रिचवतात – देशमुख

February 19, 2011 9:14 AM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारीउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यानंतर आता विलासराव देशमुख यांनीही मीडियावर सवंग टीका केली. चॅनलच्या पॅनलवर बसून देशाची चिंता करणारे मीडियावाले रात्री मात्र ग्लास रिकामे करतात. अशा शेलक्या शब्दात विलासरावांनी मीडियावर टीका केली.लातूरमध्ये पुस्तक प्रकाशनच्यावेळी विलासरावांनी ही टीका केली. काही दिवसाअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार मीडियावर तर बंदीच घातली पाहिजे अशा शब्दात मीडियावर टीका केली होती. अजितदादांच्या वक्तव्याबद्दल तीव्र पडसाद राज्य भर उमटले होते पत्रकारानी अजितदादांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होती आणि अजितदादांनी माफी मीडियाची माफी मागावी अशी मागणी लावून धरली होती दरम्यान कृषीमंत्री शरद पवारांनी अजितदादांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकारांनी आपले आंदोलन मागे घेतले.

close